शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी.

kaychalay

महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळा शिक्षक पदभरती प्रतीक्षा संपली आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२’ गुणांच्या आधारावर ही भरती प्रक्रिया करण्यात येईल. एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी भरती प्रक्रिया असून, उमेदवारांना ८ फेब्रुवारी पर्यंत प्राधान्यक्रम नोंदविता येतील.

या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांमधील १२ हजार ५२२, १८ महापालिकांमधील २ हजार ९५१, ८२ नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील ४७७ आणि १,१२३ खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील ५,७२८ रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.

राज्य सरकारने सध्याच्या रिक्त पदांपैकी ८० टक्के जागांवर भरतीला मंजूरी दिली आहे. जिल्हा परिषदांमधील काही आक्षेपांमुळे सध्या जिल्हा परिषदांमधील ७० टक्के जागांवर भरती होईल आणि उर्वरित जागांवर नंतर निर्णय घेण्यात येईल.

पवित्र पोर्टल वर नोंदणी झालेली आरक्षणा नुसार रिक्त पद संख्या वर्गानुसार खालील प्रमाणे आहे.

भरती वर्गानुसार

११ वी आणि १२ वी वर्गासाठी १ हजार १३५ शिक्षक, ९ वी आणि १० वर्गासाठी २ हजार १७६ शिक्षक, ६ वी ते ८ वी वर्गासाठी ८ हजार १२७ शिक्षक, १ ली ते ५ वीच्या वर्गांसाठी सर्वाधिक १० हजार २४० शिक्षक, पदांवर नियुक्ती होणार आहे.
पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

शिक्षक भरती 2024: अर्ज लिंक

आरक्षणानुसार रिक्त पद संख्या
अनुसूचित जाती ३,१४७
अनुसूचित जमाती ३,५४२
विमुक्त जाती (अ) ८६२
भटक्या जमाती (ब) ४०४
भटक्या जमाती (क) ५८२
भटक्या जमाती (ड) ४९३
विशेष मागास प्रवर्ग २९०
इतर मागास प्रवर्ग ४,०२४
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक २,३२४
खुला प्रवर्ग ६,१७०
माध्यमनुसार रिक्त पद संख्या
मराठी माध्यम १८,३७३
इंग्रजी माध्यम ९३१
उर्दू माध्यम १,८५०
हिंदी माध्यम ४१०
गुजराथी माध्यम १२
कन्नड माध्यम ८८
तामिळ माध्यम
बंगाली माध्यम
तेलुगू माध्यम
To Top