RBI द्वारे UPI मध्ये नविन बदल जाणून घ्या

kaychalay

UPI पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत जे 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील

या नवीन नियमांचे उद्दिष्ट अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम ऑनलाइन व्यवहार करणे आहे, ज्यामुळे व्यक्तींना कुठल्या ही प्रकारची अडचण निर्माण होवू नये व ऑनलाइन बँकिंग आणि पेमेंट व्यवहार करणे अधिक सोपे होईल.

नोटबंदीनंतर लोकांना UPI पेमेंटची जसे की Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची सवय झाली आहे त्या मुळे लोक आता कॅश जवळ ठेवतच नाही. मोबाईलच्या युगात बरंच काही बदलत चाललं आहे. कोणती ही खरेदी लहान असू की मोठी लोकं आता ऑनलाइन पैसे देणंच पसंत करतात. पण यातच UPI पेमेंट महाग होणार असल्याची बातमी पुढे आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी तुम्हाला १.१ टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क आकारले जाईल, ही बातमी आल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. या निर्णयानंतर यूपीआय वापरकर्त्यांसाठी महाग होईल का? हा शुल्क सर्व प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटवर लादला जाणार आहे की कोणत्याही विशिष्ट विभागावर त्याचा परिणाम होणार आहे? असाही संभ्रम निर्माण झाला.

UPI नियमावली काय आहे ते आपण या बदलांबद्दल जाणून घेऊया.

  1. Paytm, Google Pay, PhonePe आणि बँकांसह पेमेंट प्लॅटफॉर्मना NPCI द्वारे UPI आयडी आणि फोन अँप्सना जे एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरले गेले नाहीत ते निष्क्रिय करण्याची विनंती केली आहे.
  2. व्यवहार मर्यादा NPCI ने UPI व्यवहारांसाठी 1 लाख रुपयांची नवीन कमाल दैनिक पेमेंट मर्यादा सेट केली आहे. तथापि, आरबीआयने आरोग्य सेवा आणि शैक्षणिक संस्थांसाठी बिले यासारख्या मोठ्या शुल्काची देयके सुलभ करण्यासाठी यूपीआय व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये केली. पूर्वी व्यवहाराची मर्यादा एक लाख रुपये होती.
  3. दुय्यम बाजारासाठी UPI NPCI च्या निवेदनानुसार लवकरच बीटा चाचणीत केली जाईल हा पायलट प्रोग्राम ट्रेड कन्फर्मेशन आणि UPI द्वारे क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे पेमेंट सेटलमेंटनंतर निधी ब्लॉक करण्यास अनुमती देतो. यामुळे सिक्युरिटीज ट्रेड सेटलमेंटमध्ये क्रांती होऊ शकते. 
  4. तासांची वेळ मर्यादा UPI व्यवहार सुरक्षित करण्यासाठी, RBI ने नवीन प्राप्तकर्त्यांना रु. २ ,००० पेक्षा अधिकच्या पहिल्या पेमेंटवर चार तासांची वेळ मर्यादा लागू केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. "टॅप आणि पे" वैशिष्ट्य लवकरच UPI वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. NPCI भविष्यातील वैशिष्ट्यांचा शोध घेत आहे जसे की ATM मध्ये QR कोड वापरून पैसे काढणे. पण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 
To Top