मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे रवाना झाला असताना मागासवर्ग आयोगाने तातडीने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
आपल्या महाराष्ट्रत कुणबी मराठा सर्व्हे साठी बरेच से लोक फिरत आहे व कॉल पण येत आहेत.
कृपया कोणीच आपला आधार कार्ड, PAN कार्ड, मोबाईल OTP किंव्हा बँक खाते नंबर, एटीएम नंबर माहिती कोणाशी ही शेअर करू नये, तसेच तुम्हाला बायोमेट्रिक सिस्टीमवर अंगठा देण्याची आवश्यकता नाही, अन्यथा तुमची फसवणुक होवू शकते.
महाराष्ट्रामध्ये जो सर्वे करण्यात येत आहे तो घरोघरी जावून माहिती संकलित करणे चालू आहे, त्यासाठी तुम्हाला कुठल्याही अनोळखी व्यक्ति कडून कॉल आला तर आपली व्यक्तीक व बँक विषयक माहिती देवू नये.