३१ जानेवारी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, १ जानेवारी ला होणार बजेट सादर अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.
आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुका च्या अनुषंगाने मोदी सरकार कडून होणार शेवट बजेट जाहीर, देशातल्या जनतेला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहे, तसेच शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य हमीभाव, कर्जमाफी, शेतीविषय सवलती.
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र-सरकार कडून काही तरतूद होईल अशी बळीराजा अपेक्षा आहे, या नविन २०२४ वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पीएम किसान योजनेत केंद्र सरकार कडून होवू शकतात बदल?
सध्या पीएम किसान योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. त्याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या 11 कोटी लाभार्थ्यांना वर्षाला एकूण ६००० रूपये मिळतात. दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या २०००रु खात्यात जमा केले जातात त्या ऐवजी वर्षाला ८००० रूपये चार टप्यात मिळू शकतात ही पण एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिजोरीवर भार
केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर कोट्यवधी रुपयांचा भार सरकारच्या तिजोरीवर पडेल. पण आगामी लोकसभा निवडणुक पाहाता केंद्र सरकार प्रस्तावला मान्यता देवू शकते.
लवकरच जमा होईल १६ वा हप्ता
मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी ते मार्च महिन्यात १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.