आज अंतरवाली सराटी येथे मुंबई पदयात्राविषयी झालेली चर्चा व मार्गदर्शन :
🚩मुंबईत किमान 2 कोटी मराठे येणार.
🚩मुंबईकरांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी.
🚩किमान दीड महिण्याचे अन्नधान्य सोबत घ्यावे.
🚩मुंबईकरांनी पनवेल आणि वाशीला सहभागी व्हावे
🚩सर्वांनी पक्ष, संघटना बाजूस ठेवून मराठा सेवक म्हणून कार्य करावे.
🚩मुंबईत गाड्या पार्किंग न करता सोबतच असतील.
🚩पदयात्रा पुण्याहून शिवाजीनगर - मुंबई एक्सप्रेस वे ने जाणार.
🚩उपोषण आझाद मैदानावर असेल, स्वयंपाक शिवाजी पार्कवर होईल.
🚩दीड लाख पुरुष, तीन हजार स्त्रिया स्वयंसेवक असतील.
🚩सरकारसोबत कोणीही चर्चा करणार नाही.
🚩रोज किती किलोमीटर प्रवास, मुक्काम कोठे? याची घोषणा 10 जानेवारीला करण्यात येईल.
🚩पिण्याचे पाणी व्यवस्था करणे.
🚩बाथरूम संदर्भात सर्व महानगर पालिकांना संपर्क करा.
🚩पदयात्रेचा एकाही गावात, शहरात मुक्काम होणार नाही.
🚩डॉक्टर , ऍम्ब्युलन्स नियोजन करण्यात येईल.
🚩आपल्या संपर्कासाठी वॉररूम नियोजन करण्यात येईल.
🚩हे आंदोलन अहिंसक मार्गाने होईल - कोणी कायदा हातात घेतला तर त्यांचा आमचा संबंध असणार नाही.