सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या २०२३ वर्षात सामाजिक राजकीय ऐतिहासिक असो तसंच प्रेम प्रकरण अशा विषयांवर आधारीत अनेक चित्रपट रिलीज झाले.
प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. आपल्या देशात शेतकऱ्यांना अन्नदाताचा दर्जा आहे. अंदाजानुसार, भारतातील सुमारे ६० टक्के लोक शेती व शेती संलग्न व्यवसाय-वर अवलंबून आहेत. म्हणूनच या देशातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय शेतकरी (कृषि) दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत २३ डिसेंबर २०२३ रोजी ‘नवरदेव BSc. Agri.’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता.
खूप दिवसापासून बहू चर्चित असलेला चित्रपट ‘नवरदेव (Bsc Agri)’ येत्या २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी पसंती दिली आहे.
नवरदेव Bsc Agri या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की शेतकऱ्यांचे दुःख, व्यथा, समस्या, बाजारात भाव या सर्व विषयावर मांडणी करण्यात आलेली दिसते. गावातील एका तरुणाची शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची धडपड, गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती, जिद्दीने लढायला शिकवतोय. अशातच या तरुण्याचे कुटुंब त्याचं लग्न लावण्याच्या तयारी करत असतात. बी. एस. सी. अॅग्री केलेल्या प्रगतशील शेतकरी मुलाला लग्न करताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावं लागतं? तसेच आजच्या काळात कुठल्याच बाप आपल्या मुलीच लग्न शेतकरी मुलाशी लावून देण्यास तयार नाही प्रत्येक आई वडील लग्नासाठी नोकरी करणाऱ्या मुलांनाच आपल्या मुली देऊ इच्छितात, याच संवेदनशील विषयाला हात घालणारा चित्रपट नवरदेव (Bsc Agri). तसेच शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात घर करतो का? हे चित्रपटगृहात जाऊन बघावे लागेल.
पहा ट्रेलर:
चित्रपटाचे स्टार कास्ट
हा चित्रपट आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरुण शेतकऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहे व महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरला अभिनेत्री भूमिकेत आहे त्यासोबतच प्रविण तरडे, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गलगुंडे, विनोद वणवे, अनिरुद्ध खुटवड अशा उत्तम कलाकार या चित्रपटात पाहायला मिळेल. हे कलाकार महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत.